जेव्हा आॅफिसातील लॅण्ड लाईन फोनवर एखादा काॅल येतो तेव्हा तो रिसिव्ह करणे हे असते.
समजा समोरच्या व्यक्तीला आॅफिसातील एखाद्या व्यक्तींसोबत बोलायचे आहे तर त्याचा काॅल त्या व्यक्तीच्या केबिन मध्ये ट्रान्स्फर करणे
ऑफिस मधून पाठविण्यात आलेली पोस्ट योग्य त्या ठिकाणी पोहोचली आहे किंवा नाही हे चेक करणे.ती पोस्ट पोहोचली नसल्यास तिला ट्रॅक करणे,आॅफीसात आलेल्या पोस्ट रिसिव्ह करून ज्यांच्या करीता ती पोस्ट आली आहे त्या योग्य व्यक्ती पर्यंत ती पोहोचवणे.
आॅफिसात रोज वापरण्यात येत असलेल्या वस्तुंची महत्वाच्या संसाधनांची उपकरणांची काळजी घेणे,त्यांचा नेहमी संग्रह ठेवणे,
आॅफिसात वापरल्या जाणाऱ्या छोटछोटया वस्तु जसे की पेन पेपर पेन्सिल इत्यादीकडे लक्ष देणे त्यांचे योग्यरीत्या व्यवस्थापन करणे.
आॅफिसात काम करत असलेल्या कर्मचारी वर्गाला आवश्यकता असलेल्या वस्तुंचा पुरवठा करणे.ऑफिस मध्ये मिटिंग वगैरे असल्यास मिटिंग अरेंज करणे मिटिंग साठी सर्वांना मॅसेज ईमेल करणे,मिटिंग रूम तयार करणे तिथे झाडझुड साफसफाई,स्वच्छता वगैरे करणे.
मिटिंग रूममध्ये बसविण्यात आलेली महत्वाची संसाधने जसे की प्रोजेक्टर वगैरे इत्यादी वस्तू योग्यरीत्या व्यवस्थित कार्य करीत आहेत किंवा नाहीत हे बघणे समजा एखादे संसाधन व्यवस्थित कार्य करीत नसेल तर त्याची दुरूस्ती करून घेणे.
मिटिंग मध्ये वापरण्यात येत असलेल्या महत्वाच्या कागदपत्रांचे नीट व्यवस्थापन करणे.त्यांना सिक्वेनसली अरेंज करणे.
आॅफिसात आलेल्या अतिथींचे आदरातिथ्य करणे त्यांना बसवुन चहापाणी करणे कोणाशी भेटायचे आहे,काय काम आहे याची विचारपूस करणे त्यांची मिटिंग फिक्स करणे.
ऑफिस मध्ये कंप्युटरवर बसुन टायपिंगचे काम करणे,एखादे लेटर तयार करणे,पेपरचे प्रिंट काढणे, झेरॉक्स वगैरे काढणे कागदपत्रे स्कॅन करणे इत्यादी कामे देखील ऑफिस असिस्टंट करीत असतो.
याचसोबत आॅफिसात वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेस मध्ये प्रोजेक्टर प्रिंटर कंप्युटर प्रिंटिंग मशिन इत्यादी मध्ये काही बिघाड झाल्यास काही अडचण आल्यास ती समस्या दूर करणे.त्यांची दुरूस्ती करणे.